महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मॅनहोलमध्ये पडलेल्या शेतकऱ्याचा तब्बल ३९ दिवसानंतर शोध; मृतांची सख्या ४

रामेश्‍वर पेरुबा डांबे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचा सुखना नदीच्या ड्रेनेजमध्ये शरीर कुजल्याने फक्त सांगाडाच हाती लागला आहे.

मॅनहोलमध्ये पडलेल्या शेतकऱ्याचा तब्बल ३९ दिवसानंतर शोध

By

Published : Apr 27, 2019, 11:21 PM IST

औरंगाबाद- मॅनहोलमध्ये पडलेल्या शेतकऱ्याचा तब्बल ३९ दिवसानंतर शोध लागला असून मृतांची संख्या आता ४ झाली आहे. रामेश्‍वर पेरुबा डांबे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचा सुखना नदीच्या ड्रेनेजमध्ये शरीर कुजल्याने फक्त सांगाडाच हाती लागला आहे. त्याने परिधान केलेल्या कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

१८ मार्च रोजी मॅनहोलमध्ये अनधिकृतरित्या टाकलेल्या मोटारीच्या फुटबॉलमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेल्या ३ शेतकऱयांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला होती. या घटनेत बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचा शोध तब्बल ३९ दिवसानंतर लागला, पाण्यात दीर्घकाळ राहिल्याने मृतदेह पूर्णपणे कुजला असून फक्त सांगाडाच शिल्लक राहिला आहे. रामेश्‍वर पेरुबा डांबे (वय २७, रा. निकळक अकोला, ता. बदनापूर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे सासरे व इतरांना वाचवण्यासाठी तो मॅनहोलमध्ये धावत गेला व आत उतरल्यानंतर गुदमरून ड्रेनेजलाईनमध्ये वाहत गेल्याने बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह एका व्यक्तीला दिसून आला. त्याने ही बाब अग्निशामक दलाला कळवली. त्यावेळी घटनास्थळावरील मॅनहोलपासून चौथ्या मॅनहोलमध्ये एक मृतदेह दिसून आला. यानंतर तो बाहेर काढून याबाबत एमआयडीसी सिडको पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात तो मृतदेह देण्यात आला आहे.

यापूर्वी या घटनेत जनार्दन विठ्ठल साबळे (वय ५०, रा. कावडे यांचा शेत आखाडा, मूळ वरझडी, ता. जि. औरंगाबाद), दिनेश जगन्नाथ दराखे ( वय ३७, रा. चिकलठाणा), उमेश जगन्नाथ कावडे (वय ३२) यांचा मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्यू झाला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details