महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात आढळले मृत कावळे - Bird flu marathi

सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास कावळ्यांचा अचानक तडफडुन मुत्यू झाल्याची घटना घडली.

मृत कावळे

By

Published : Feb 5, 2021, 7:28 PM IST

सिल्लोड -कोरोना संपण्याच्या मार्गावर असतांना राज्यात बर्ड फ्लूने डोकं वर काढल आहे. सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास कावळ्यांचा अचानक तडफडुन मुत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वनविभाग सिल्लोड व पशुसंवर्धन विभागास माहीती कळवली-

गूरूवारी मध्यरात्री येथील वडेश्वर मंदीराच्या परिसरातील नाल्यात आजूबाजूला काही अंतराने कावळे मुत्यूमूखी पडले होते. ही माहीती ग्रामपंचायत सदस्य सय्यद महेमुद यांनी सकाळी फिरायला गेले असता लक्षात आली. त्यांनी लगेचच ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी नामदेव दांडगे यांना माहीती दिल्यावर त्वरीत वनविभाग सिल्लोड व पशुसंवर्धन विभागास माहीती कळवली. माहीती मिळताच वनविभागाचे पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशु संवर्धन अधिकारी अभिषेक खडसे, पशु वैद्यकीय अधिकारी आशिष साळवे यांनी येवून मृत अवस्थेत असलेल्या पक्षांना ताब्यात घेतले. तसेच पुढील तपासणीसाठी वरीष्ठ कार्यालयात पाठवून दिले आहे.

तिनशे मिटरच्या आत जाण्यास प्रतिबंध-

तसेच मृत कावळे आढळलेल्या ठीकाणी तिनशे मिटरच्या आत माणसांना जाण्यास प्रतिबंध करण्यात आले. तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकिय अधिकारी आशिष साळवे यांनी केले आहे.

हेही वाचा-विशेष: चौघी बहिणींनी शेती कसून कुटुंबाला दिली उभारी...

ABOUT THE AUTHOR

...view details