औरंगाबाद - कोरोना वाढता संसर्ग पाहता घराबाहेर पडताना आणि कंपनीत काम करताना भीती तर वाटते. मात्र, आता या आजारासोबत राहण्याची तयारी करत असून सुरक्षित राहून काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत औरंगाबादच्या कामगारांनी व्यक्त केले आहे.
कोरोनामुळे कंपनीत काम करताना भीती वाटते, मात्र त्यावर मात करून काम करतोय - कामगारांची भावना
'उद्योगांचा बंद करू नका' यासाठी उद्योजक आक्रमक होते. अशा परिस्थितीत कामगारांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. कंपनीत काम करताना कामगार स्वतःहून काळजी घेऊ लागले आहेत. जेवण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. एका टेबलवर जेवण करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. एकमेकांची भीती दूर करून मनावर असलेला ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार करत आहेत.
घरी येताना आपण बाधित तर नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडायला लागले. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औद्योगिक वसाहतीत बंद पाळण्याची मागणी करण्यात आली. मात्र आधीच दोन महिन्यांच्या बंदमुळे उद्योगांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे 'उद्योगांचा बंद करू नका' यासाठी उद्योजक आक्रमक होते. अशा परिस्थितीत कामगारांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला आहे. कंपनीत काम करताना कामगार स्वतःहून काळजी घेऊ लागले आहेत. जेवण्याच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. एका टेबलवर जेवण करत असताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. कामावर येत असताना कंपनीच्या प्रवेशद्वाराला प्रत्येक कामगार स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत आहे. इतकेच नाही तर, एकमेकांची भीती दूर करून मनावर असलेला ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार करत आहेत. औरंगाबादच्या कामगारांसोबत विशेष बातचित केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.