औरंगाबाद - मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद येथे पालकमंत्री सुभाष देसाईंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या अनुषंगाने पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री कार्यक्रमास हजर नव्हते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला.
'आजचा दिवस हा अन्याय, अत्याचाराविरोधात लढ्याचे प्रतिक आहे. मराठवाड्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. आज आपले युद्ध कोरोना विषाणूशी आहे. मास्क आपले हत्यार असून आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे. आपण हे युद्ध जिंकणारच व मराठवाडाच नव्हे तर, महाराष्ट्र कोरोनामुक्त करू,' असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम लोकचळवळ व्हावी व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होणार असेही त्यांनी सांगितले. मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत. मुंबई व पुण्याच्या धर्तीवर मराठवाड्यात विकास महामंडळ मी लवकरच करणार आहे,'असे त्यांनी सांगितले.मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन हजेरी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कोरोनाच्या अनुषंगाने पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमास हजर नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ प्रक्षेपणाद्वारे संवाद साधला. मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी पालकमंत्र्यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिले.
हेही वाचा -मराठा आरक्षणाचा लढा जिंकण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करणार - मुख्यमंत्री
याप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. उपस्थित मंत्र्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटी घेतल्या. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या महिला समन्वयकांनी पालकमंत्र्यांना मराठा आरक्षणाबाबत निवेदन दिले. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते सुसज्जित कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.