महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद: बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय राहणार बंद

सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना बर्ड फ्लूचा आजार होऊ नये, यासाठी प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीजेस विभागाने दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आधीच दहा महिन्यांपासून प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात आलं होतं. तर आता बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे.

By

Published : Jan 12, 2021, 5:16 PM IST

बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय राहणार बंद
बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय राहणार बंद

औरंगाबाद -सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना बर्ड फ्लूचा आजार होऊ नये, यासाठी प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसीजेस विभागाने दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आधीच दहा महिन्यांपासून प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात आलं होतं. तर आता बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे.

बर्ड फ्लूपासून प्राण्यांची सुरक्षा करण्यासाठी निर्णय

बर्ड फ्लूचा विषाणू हवेतून पसरत असल्याने त्याचा सर्वाधिक धोका प्राण्यांना असतो. रोगामुळे कोंबड्या आणि झाडांवरील पक्षी मृत अवस्थेत आढळून येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना सुरक्षीत ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत आहेत. ॲनिमल डिसेस संस्थेने शनिवारी परिपत्रक काढून बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात यावे असे आदेश दिले आहेत. तसेच प्राण्यांना मांसाहार देताना मांस मिठाच्या पाण्यात अर्धा तास ठेवून नंतर धुऊन स्वच्छ करून त्यांना द्यावे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राण्यांची नियमित तपासणी करावी. प्राण्यांना इतर प्राण्यांच्या संपर्कात येऊ देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राणीसंग्रहालयात प्राण्यांच्या पिंजऱ्यात पक्षांनी येऊ नये, यासाठी बुजगावणे देखील उभे करण्यात आले आहेत. तसेच प्राणीसंग्रहालय बंद ठेवण्यात येणार असून, प्राणीसंग्रहालयामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

बर्ड फ्लूमुळे प्राणीसंग्रहालय राहणार बंद

शहरातील प्रत्येक वॉर्डात ठेवलं जात आहे लक्ष

शहरामध्ये प्रत्येक वॉर्डात एक समिती निर्माण करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे दिलेल्या सूचनेनुसार हे काम केले जात असून, कोठेही मृत पक्षी आढळून आला तर त्याची तातडीने माहिती देण्यात येईल. इतकच नाही तर त्याची तातडीने तपासणी देखील करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशी एकही घटना आढळून आली नसल्याचे महापालिका अयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details