औरंगाबाद -येथील एका लग्न समारंभाची चर्चा चांगलील रंगली आहे. प्रथमदर्शनी पाहिल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम दिसणाऱ्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करण्यात आले आहे. एका अनाथ मुलीच्या लग्नासाठी चक्क सिने कलाकार, राजकारणी यांनी हजेरी लावत अनाथ मुलीला आशीर्वाद दिले. गौरी असे या अनाथ मुलीचे नाव आहे.
अनाथ गौरीच्या विवाहासाठी राजकारण्यांसह अभिनेत्यांची हजेरी हेही वाचा-काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग
औरंगाबादचे उपमहापौर विजय औताडे यांच्या कुटुंबीयांनी 17 मुलींना दत्तक घेतले आहे. त्यातील गौरीचा विवाह विजय औताडे यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्त करण्याचे ठरवले होते. औरंगाबादच्या हर्सूल भागात गौरी आणि अमित यांचा विवाह सोहळा आयोजित केला होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, अभिनेते भारत गणेशपुरे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. एकंदरीत पाहता हा विवाह सोहळा शहरातील प्रतिष्ठित आणि धनाढ्य व्यक्तीच्या मुलीचा असेल असं वाटत होतं. मात्र, ज्या गौरीचा हा विवाह सोहळा होता ती बालपणापासून अनाथ आश्रमात वाढलेली आहे.
अनाथ मुलीला देखील आनंद उपभोगण्याचा अधिकार आहे. तिला देखील कुटुंब असून तिचा विवाह सोहळा थाटात पार पडावा. तिला देखील तो आनंद घेता यावा, यासाठी गौरीचा मोठा भाऊ म्हणून विवाह थाटात लावल्याचे उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले.