औरंगाबाद :ग्रामीण भागातील युवाकाला विमा क्षेत्रातला MDRT- अमेरिका पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल विलास फकीरराव थोरात (Vilas Fakirrao Thorat) यांना जाहीर झाला आहे. अमेरिकेत होणाऱ्या (MDRT:2023) च्या जागतिक परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
America Award : ग्रामीण भागातील युवकाला विमा क्षेत्रातला अमेरिका पुरस्कार जाहीर...
ग्रामीण भागातील युवाकाला विमा क्षेत्रातला MDRT- अमेरिका पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल विलास फकीरराव थोरात (Vilas Fakirrao Thorat) यांना जाहीर झाला आहे.
एक लाख रुपयांच्या निधी गावाच्या विकासासाठी :थोरात यांचे मूळ गांव औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यातील विरगांव असून त्यांनाच्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल यापूर्वीही दोन वेळेस त्यांच्या गावाला विमा ग्राम योजने अंतर्गत एलआयसी दोन्ही वर्षी कडून एक लाख रुपयांच्या निधी त्यांच्या गावाच्या विकासासाठी यापूर्वी खर्च केला आहे.
ग्रामीण भागामध्ये विम्याचे महत्व : ग्रामीण भागामध्ये विम्याचे महत्व काय असते हे पटवून देण्याचे कार्य चार वर्षापासून थोरात हे सतत करत आले आहे, विनम्र व तत्पर सेवा तसेच लोकांचा विश्वासामुळे हे विकास अधिकारी स्वप्निल बोरसे यांच्या मुळे यश प्रधान करू शकलो असे थोरात म्हणाले. हा पुरस्कार प्रदान झाल्याने एलआयसी परिवाराकडून, त्यांच्या कौटुंबिक व मित्र परिवाराकडून त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आले. औरंगाबादचे एका ग्रामीण भागातून या युवकाने अमेरिकेच्या सर्वोच्च पुरस्कार मध्ये घेतलेली गरुड झेप पाहून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Importance of insurance in rural areas)