औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पैठण येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. माहेश्वरी धर्मशाळा याठिकाणी त्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. कार्यक्रमादरम्यान एकाच पक्षातले दोन नेते माजी आमदार संजय वाघचौरे आणि मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले दत्ता गोर्डे यांच्या समर्थकांनी जबरदस्त गोंधळ घातला. सुप्रिया सुळे यांच्या समोर एका गटाचे कार्यकर्ते बोलायला लागले की दुसरा विरोधी गट जबरदस्त गोंधळ घालायचा, हे सर्व आपल्या नजरेसमोर होत असल्याची खंत व्यक्त करत दोन्ही गटांना तंबी दिली. या नंतर नाराज होत त्या औरंगाबादकडे रवाना झाल्या
सुप्रिया सुळे यांच्या पैठणमधील सभेदरम्यान दोन गटात राडा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पैठण येथे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात माजी आमदार संजय वाघचौरे आणि दगोर्डे यांच्या समर्थकांनी गोधळ घातला.
संजय वाघचौरे आणि दत्ता गोर्डे यांच्यातला वाद विधानसभा निवडणुकीपासून चालू आहे. माजी आमदार संजय वाघचौरे यांनी पक्षाचा बी फॉर्म आणला होता तर रातोरात पक्षांनी त्यांना डावलून दत्ता गोर्डे यांना बीफार्म बहाल केला होता. विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादी काँग्रेसने संजय वाघचौरे यांना डावलून, पक्षांनी आपली खरी उमेदवारी दत्ता गोर्डे यांना बहाल केली. दत्ता गोर्डे यांनी विद्यमान कॅबिनेट मंत्री व चार वेळा आमदार राहिलेल्या संदिपान भुमरे यांना कडवी टक्कर दिली होती. 70 हजार मतदान घेऊन अवघ्या पंधरा हजाराच्या फरकाने दत्ता गोर्डे पराभूत झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या या बी फार्मच्या वादातून दत्ता गोर्डे आणि संजय वाघचौरे त्यांचे समर्थक नेहमी मी अशा कार्यक्रमात आमने-सामने असतात.