औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील नागद येथे बारावी परीक्षेत कॉपीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत गणित विषयाची परीक्षा पार पडली. त्यात नागद येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर शिक्षण अधिकारी बी. बी. चव्हाण यांचा पथकाने कॉपी प्रतिबंधक कारवाई केली.
शिक्षक आणि प्राचार्यांवरही मुंबई पोलीस कायदा कलम 37(1,3) प्रमाणे 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक महाविद्यालयात असताना प्राचार्य ताराचंद नेमीचंद बिंदवाल, शिक्षक शेखर जगदिश पाटील, रवींद्र बाळासाहेब निकम हेही महाविद्यालयातच होते. याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी कन्नड पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारींतर गुन्हा दाखल करण्यात आला.