औरंगाबाद - प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या आधी दिले. त्यावरून अनेक वेळा टीका झाली. मात्र, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याच्या जनधन खात्यात 15 लाख ( 15 lakh deposite in Farmer Account ) जमा झाले. पंतप्रधानानी आपला शब्द पाळाला, अस त्याला वाटल त्याने त्यांचे आभार मानले, पण नंतर त्याच्यावरच पैसे परत करण्याची नामुष्की ओढवली आहे.
शेतकऱ्याने मानले आभार
पैठण तालुक्यातील दावरवाडीतील शेतकरी ज्ञानेश्वर जनार्धन औटे यांच्या, बँक ऑफ बडौदाच्या जनधन खात्यावर 17 ऑगस्ट 2021 रोजी 15 लाख 34 हजार रुपए जमा झाले. (15 lakh was deposited in Jandhan account) पैसे जमा झाल्यावर पाहिले काय कराव सुचत नव्हते. पैसे कसे आले असे अनेक प्रश्न पडले. मात्र हे पैसे पंतप्रधान मोदींनी मोदी यांनी पाठवले अस त्याला वाटल. जनधन मध्ये पैसे आले तर चर्चा तर होणारच, मग काय अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन केलं. तर ज्ञानेश्वर यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल करत आभार मानले.