महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपुरात कडकडीत बंद, नागरिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

पंढरपूर येथील सरकारी जमिनीवरील वापराची सर्व बांधकामे आणि ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त रहिवासी वापरासाठीची बांधकामे काढण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

By

Published : Mar 10, 2019, 11:33 AM IST

पंढरपुरात कडकडीत बंद, नागरिक जाणार सर्वोच्च न्यायालयात

औरंगाबाद -उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या पंढरपूर वासियांनी शनिवारी एकजुटीचे दर्शन दाखवत सर्वोच्च न्यायालयात लढा देण्याचे ठरवले आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वतंत्र याचिका दाखल केली जाणार आहे. भक्तआणि व्यापाऱ्यांच्यावतीनेही याला आव्हान देणारी याचिका दाखल केली जाणार आहे. यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात झाली आहे. कृती समितीसोबत आणखी २ समित्या गठीत करण्याचे शनिवारच्या बैठकीत ठरवण्यात आले. दरम्यान पंढरपूर वासियांनी बंद ठेवत घटनेचा निषेध केला.

पंढरपूर येथील सरकारी जमिनीवरील वापराची सर्व बांधकामे आणि ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त रहिवासी वापरासाठीची बांधकामे काढण्याची कारवाई जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर पंढरपूरमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी पंढरपूरमधील सर्व दुकाने बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला. या निकालानंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थ आणि व्यवसायिकांची बैठक घेण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details