महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ETV Bharat Exclusive: घोटभर पाण्यासाठी मेळघाटातील महिलांची डोंगरदऱ्यांतून पायपीट

आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील शेकडो नागरिकांना पाण्याची चिंता सतावत आहे. या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. डोक्यावर हंडा घेऊन घोट भर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या या महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी....

By

Published : Apr 29, 2020, 2:12 PM IST

Melghat water scarcity
मेळघाट पाणी प्रश्न

अमरावती -संपूर्ण देश कोरोनामुळे चिंतेत पडला आहे. मात्र, आदिवासी बहुल भाग असलेल्या मेळघाटातील शेकडो नागरिकांना पाण्याची चिंता सतावत आहे. या भागातील पाणीटंचाईचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहे. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी भर उन्हात महिलांना आणि लहान मुलींना दीड-दोन किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र सध्या येथे पहायला मिळत आहे.

घोटभर पाण्यासाठी महिलांची डोंगरदऱ्यांतून पायपीट

अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील एकझिरा या गावात मागील चार वर्षांत दहा लाख निधी खर्च करून सुध्दा पाणी प्रश्न मिटला नाही. प्रशासनाच्यावतीने गावात दोन बोरवेल खोदण्यात आले मात्र, त्याला पाणीच नसल्याने महिलांना गावापासून दीड किलोमीटर दूर असलेल्या विहीरीवरून पाणी आणण्यासाठी डोंगर दऱ्यातून मार्ग शोधावा लागत आहे. गावात ठराविक दिवसांनी टँकरने पाणी पुरवठा होतो. त्या अपुऱ्या पाण्यात गरज भागत नसल्याने या महिला एका ब्रिटिश कालीन विहरीवर पाणी भरण्यासाठी जातात.

या विहिरीचे पाणी गढूळ असल्याने अनेक आजारांना सामना या आदिवासी बांधवांना करावा लागत आहे. डोक्यावर हंडा घेऊन घोट भर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या या महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी....

ABOUT THE AUTHOR

...view details