अमरावती - मेळघाटात सुरू असलेल्या भूमकाच्या(अंधश्रद्धा)उपचारावर विश्वास ठेवत शासकीय आरोग्य सेवेच्या उपचाराला नकार देऊन भूमकाकडे उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. धारणी तालुक्यातील जुटपाणी या गावात ही धक्कादायक घटना घडली असून त्या महिलेची १५ दिवसांपूर्वी प्रसूती झाली होती. रविवारी पहाटे हा प्रकार समोर आला आहे. सुखमनी कासदेकर (रा. झापल), असे मृत महिलेचे नाव आहे.
धारणी तालुक्यातील झापल या गावातील रहिवासी असलेली सुखामनी या महिलेची ११ जुलैला जुटपाणी या गावातील भूमका परिहारच्या घरी प्रसूती झाली होती. त्यानंतर या प्रसूतीची माहिती स्थानिक आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी भूमकाकडे गेले. त्यांनी त्या महिलेला व तिच्या नवजात बालकाला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, तेथे सहा तासांतच त्या नवजात बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर तेथून दोन दिवसांनी तिला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर २५ जुलैलै परत तिला उपचारासाठी धारणी येथील रुग्णालयात आणले होते. मात्र, तिने तेथून मध्यरात्री पळ काढत थेट भूमकाचे घर गाठले. तिने रुग्णालयातून पळ काढल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिचा मागोवा घेत ते भूमकाकडे पोहोचले. त्यावेळी तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. याच दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला व तिच्या कुटुंबाला रुग्णालयात उपचार घेण्यासाठी विनंती केली. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला.
धक्कादायक! रुग्णालयात उपचार घेण्यास नकार देणाऱ्या बाळंतिणीचा भूमकाच्या घरी मृत्यू
२५ जुलैला भूमकाकडचे उपचार संपल्यावर त्या महिलेला आरोग्य विभागाने धारणी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती खालावत असल्याने तिला अमरावती येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिने व कुटुंबाने अमरावतीला जाण्यास नकार देत पुन्हा शनिवारी रुग्णालयातून पळ काढला व भूमकाकडे उपचार घेण्यास गेली. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिचा भूमकाच्या घरीच अखेर मृत्यू झाला.
भूमकाचा उपचार होईपर्यंत आम्ही दुसरीकडे कुठेच उपचार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्याचदरम्यान २५ जुलैला भूमकाकडचे उपचार संपल्यावर त्या महिलेला आरोग्य विभागाने धारणी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती खालावत असल्याने तिला अमरावती येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिने व कुटुंबाने अमरावतीला जाण्यास नकार देत पुन्हा शनिवारी रुग्णालयातून पळ काढला व भूमकाकडे उपचार घेण्यास गेली. मात्र, तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिचा भूमकाच्या घरीच अखेर मृत्यू झाला.