महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा 67 टक्क्यांवर

अमरावती

By

Published : Aug 29, 2019, 12:12 PM IST

Updated : Aug 29, 2019, 2:17 PM IST

11:44 August 29

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकूण 89.44 टक्के समाधानकारक साठा


अमरावती - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा  67 टक्क्यांवर येऊन पोहचला आहे. मागील चार दिवसांपासून अप्पर वर्धा धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही एकूण 89. 44 टक्के इतका समाधानकारक साठा झाल्याने आगामी काळातील सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या  निकाली निघाली आहे. मागील तीन दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अमरावती शहराला तसेच वरुड, मोर्शी तालुका, वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका यासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणासह, शहानूर चंद्रभागा पूर्णा व सपन या मध्यम प्रकल्पातही समाधानकारक साठा निर्माण झाला आहे.

Last Updated : Aug 29, 2019, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details