महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या वरुड पोलिसांनी चोरट्यांकडून केल्या १३ दुचाकी जप्त; ४ आरोपींना अटक

जिल्ह्यातील वरुड आणि शेंदूरजना परिसरात मागील १५ दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वरुड पोलिसांनी चोरट्यांचा शोध लावत त्यांच्याकडून १३ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

warud police seized thirteen bikes
वरुड पोलिसांनी जप्त केल्या 13 दुचाकी

By

Published : Jul 20, 2020, 1:16 PM IST

वरुड(अमरावती)- मागील पंधरा दिवसात अमरावतीच्या वरुड व शेंदूरजना घाट परिसरातून चोरट्यांनी चोरून नेलेल्या तब्बल १३ दुचाकी १५ दिवसांतच जप्त करण्यात वरुड पोलिसांना यश आले आहे. रविवारी वरुड पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून विविध कंपनीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्याची किंमत नऊ लाख पंधरा हजार रुपये आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपी मध्ये मध्यप्रदेश मधील एका आरोपीचाही समावेश आहे.

शुभम राजू जगदेव रा .शेंदूरजना घाट, सुमित शिवराम धुर्वे रा .शेंदूरजना घाट, रोशन गंगाराम उईके.रा .शेंदूरजना घाट ,सतीश तुळशीराम सूर्यवंशी रा. बैतुल अशी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींनी मागील १५ दिवसात परिसरातील एकूण १३ दुचाकी चोरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

वरुड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शेंदूरजना घाट येथील आरोपी शुभम जगदेव याला सर्वात आधी अटक करून त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत जगदेव याने उर्वरित तीन आरोपींची नावे पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांच्या कडून ९ लाख पंधरा हजार रुपये किंमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या.

चारही आरोपींची पोलीस चौकशी करत असून आणखी कुठे दुचाकी चोरल्यात का याचा शोध सुरु आहे. सदर कारवाई वरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details