महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरुडमध्ये वीज पडून दोन मजूर महिलांचा मृत्यू

वरुड तालुक्यातील जरुड गावाच्या परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान जरुड शेत शिवारातील हनुमंत दिघेकर यांच्या शेतात शोभा खाडे आणि मिरा गायधने यांच्या अंगावर वीज पडली. यात दोघींचा जागीच मृत्यू झाला.

Two woman died in thunder strom
वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू

By

Published : Jul 23, 2020, 12:44 PM IST

अमरावती -कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी शेतावर मोलमजुरी करायला गेलेल्या दोन मजूर महिलांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये दोन्ही महिलांचा मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील जरुड गावाच्या शिवारात ही घटना घडली.

शोभा रमेश खाडे (वय ५०) आणि मिरा धर्मराज गायधने (वय ४६) वीज पडून मृत्यू झालेल्या मजूर महिलांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. वरुड तालुक्यातील जरुड गावाच्या परिसरात विजांचा कडकडाट सुरू होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान जरुड शेत शिवारातील हनुमंत दिघेकर यांच्या शेतात ७ महिला मजूर काम करत होत्या.

दरम्यान, विजांचा कडकडाट सुरू असल्याने त्यातील पाच महिला शेतातून निघून गेल्या. त्या दूर अंतरावर गेल्यानंतर मागे राहिलेल्या शोभा रमेश खाडे आणि मिरा धर्मराज गायधने या दोघींच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. जरुड परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही महिलांच्या मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details