अमरावती- लॉकडाऊन काळात पर्यटनाला खिळ बसली होती. मात्र अनलॉक 5.0मध्ये पर्यटनस्थळ सुरू करण्यात आल्याने, नागरिक घराबाहेर पडत आहेत. अनलॉक 5.0मध्ये विदर्भातील नागरिकांनी मेळघाटला पसंती दिली आहे. त्यात मागील पाच दिवसांपासून मेळघाटात परतीचा पाऊस बरसत असल्याने सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. मेळघाटमधील चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होते आहे.
चिखलदऱ्यात पर्यटकांची गर्दी, परतीच्या पावसाने पसरली धुक्याची चादर
अनलॉक ५.०मध्ये विदर्भातील नागरिकांनी मेळघाटला पसंती दिली आहे. त्यात मागील पाच दिवसांपासून मेळघाटात परतीचा पाऊस बरसत असल्याने सर्वदूर धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे मेळघाटमधील चिखलदरा येथे पर्यटकांची गर्दी होते आहे.
tourists prefering chikhaldara after lockdown
अतिशय निसर्गरम्य असं दृश्य चिखलदरा येथे आहे. मेळघाटातील सातपुडा पर्वत रांगेत असलेल्या चिखलदरा आता पर्यटकांनी फुललं आहे. पर्यटकांमुळे स्थानिकांचा रोजगार देखील सुरू झालाय. शक्कर तलावाजवळ पर्यटक गर्दी करत आहेत, याठिकाणी बोटिंग सुविधा असल्याने पर्यटक मनसोक्त आनंद घेत आहेत. चिखलदरामधील सर्व पर्यटन पॉइंट गर्दीने बहरले असून कोरोनाचे सर्व नियम पाळून येथे पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे.