महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण ८२ टक्के भरले आहे. धरणक्षेत्रात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

By

Published : Jul 31, 2019, 7:18 PM IST

अमरावती - जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे मेळघाटच्या पायथ्याशी असणारे सापन प्रकल्प धरण ८२ टक्के भरले आहे. लवकरच आता हे धरण पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर असल्याने प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. सापन प्रकल्पामध्ये मागील वर्षी केवळ पन्नास टक्के पाणी साठा होता.

मेळघाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या सापन प्रकल्प धरणात ८२ % पाणी साठा

धरणक्षेत्रात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे .

ABOUT THE AUTHOR

...view details