अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा व एकात्मतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची १११ वी जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव आज(गुरुवार) आहे. देशात कोरोनाचे सावट असल्याने इतिहासात पहिल्यांदाच फक्त पाच गुरूदेव भक्तांच्या उपस्थितीत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद गावात पहाटे साडेपाच वाजता पार पडला.
इतिहासात पहिल्यांदाच पाच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा
दरवर्षी तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या यावली शहिद गावात दरवर्षी हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता अतिसाध्या पद्धतीने केवळ ५ गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून पहाटे साडेपाच वाजता हा सोहळा पार पडला.
देशात कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंत अर्थात ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी राज्यभर ३० एप्रिलला गुरूदेव भक्त मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने घरी राहून राष्ट्रवंदना म्हणून ग्रामजयंती साजरी करावी, असे आवाहन गुरूदेव भक्तांना करण्यात आले आहे. दरम्यान दरवर्षी तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा त्यांची जन्मभूमी असलेल्या यावली शहीद गावात दरवर्षी हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता अतिसाध्या पद्धतीने केवळ ५ गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून पहाटे साडेपाच वाजता हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी गावातील लोकांनी सामाजिक अंतर राखून संपूर्ण गाव स्वच्छ करून घेतले. त्यानंतर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या अन् दिव्यांच्या मंद प्रकाशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी न्हाहून निघाली होती.