महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनी खाली बसूनच दिली 'नवोदय'ची परीक्षा; मोर्शी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्याकरीता सुरुवातीपासूनच विविध परीक्षा द्याव्या लागतात. त्यातच नवोदयची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते.

विद्यार्थ्यांनी खाली बसूनच दिली 'नवोदय'ची परीक्षा

By

Published : Apr 7, 2019, 12:43 PM IST

अमरावती - जिल्ह्यात शनिवारी घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेचा पेपर विद्यार्थ्यांना खाली बसूनच सोडवावा लागला. हा प्रकार मोर्शीच्या जिल्हा परिषद शाळेत घडला. नवोदय परीक्षेत स्थानिक जिल्हा परिषद शाळेत डेक्सची संख्या कमी असल्यामुळे काही विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे या परीक्षेचे महत्त्व प्रशासनाला आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांनी खाली बसूनच दिली 'नवोदय'ची परीक्षा


आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी होण्याकरीता सुरुवातीपासूनच विविध परीक्षा द्याव्या लागतात. त्यातच नवोदयची परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची समजली जाते. यामध्ये वर्ग ५ वर्ग ८ याकरीता ही परीक्षा असते. शनिवारी ही पूर्व परीक्षा सगळीकडे घेण्यात आली. मोर्शी शहरातील ३ केंद्रावर सुद्धाही परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये पार पडली. यामध्ये शिवाजी उच्च माध्यमिक शाळा शिवाजी कन्या शाळा व जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक शाळा असे ३ केंद्र होते. जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये २०० विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून होते. त्यापैकी १९२ विद्यार्थी हजर होते. तर ८ विद्यार्थी अनुपस्थित होते. या शाळेमध्ये इतक्या विद्यार्थ्यांना बसण्याकरीता डेक्स नसल्यामुळे दोन वर्गातील विद्यार्थ्यांना खाली बसून परीक्षा द्यावी लागली.


ही परीक्षा बहूपर्यायी असल्याने विद्यार्थ्यांना डेक्सवरच पेपर लिहावा लागतो. परंतु संबंधित विभागाने केंद्र देताना या शाळेमध्ये सर्व भौतिक सुविधा आहे काय? हे न पाहिल्यामुळे आज काही विद्यार्थ्यांना खाली बसून पेपर द्यावा लागला. या परीक्षेकरीता तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते, त्यांनासुद्धा खाली बसून ही परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details