अमरावती- गेल्या अनेक वर्षांपासून कुपोषणाची काळी किनार लागलेल्या मेळघाटात आजही कुपोशित बालके आढळतात. शासन कितीही गाजावाजा करत असले तरी अनेक आदिवासी मुलापर्यंत कुपोषणासंबिधित योजना पोहचत नसल्याने अनेक लहान मुले आजही कुपोषमग्रस्त आहेत. तर दुसरीकडे अमरावती शहरात मात्र फास्ट फूड खाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. परिणामी १ ते ५ या वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणा मोठया प्रमाणात आढळून येत आहे. एकीकडे बालकांमध्ये वाढते कुपोषण आणि दुसरीकडे वाढत्या लठ्ठपणावर आळा घालण्याचे प्रशासनामोर आवाहन आहे.
कुपोषणाचे मुख्य कारण
मेळघाटात कुपोषणाचे मुख्य कारण म्हणजे तिथल्या मुलांच्या आहारात पालेभाज्यांची असलेली कमतरता. मेळघाटामध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, पाणी अडव्यासाठी योग्य सुविधा नसल्यामुळे तिथे भाजीपाल्याची लागवड करता येत नाही. परिणामी आहारात हिरव्या भाज्यांचा सामावेश नसल्यामुळे कुपोषण वाढते. तसेच लहान मुले मातीत खेळत असल्यामुळे त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिलीप रणमले यांनी केला आहे. बालकांना योग्य वेळी सकस व पूरक आहार मिळत नसल्यामुळे त्यांच्यात कुपोषणाची समस्या जाणवते.