महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या तिवसा येथील सोटागिर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

तिवसा नगरीचे आराध्य दैवत असलेल्या या सोटागिर महाराज देवस्थानावर नागरिकांची अपार श्रद्धा आहे. यासाठी महाराजांच्या पवित्र संजीवन समाधी सोहळा, हरिनाम सफ्ताह आणि गाथा प्रवचन या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जाते.

अमरावतीच्या तिवसा येथील सोटागिर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

By

Published : May 4, 2019, 6:08 PM IST

अमरावती -जिल्ह्यातील तिवसा नगरीचे आराध्य दैवत समजले जाणारे समर्थ सोटागिर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली आहे. २५ एप्रिल पासून येथे विविध उपक्रम राबविण्यात येत होते. गुरुवारी (२ मे) रोजी या कार्यक्रमाची महाकाल्याने सांगता झाली. या सोहळ्यात तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

तिवसा नगरीचे आराध्य दैवत असलेल्या या सोटागिर महाराज देवस्थानावर नागरिकांची अपार श्रद्धा आहे. यासाठी महाराजांच्या पवित्र संजीवन समाधी सोहळा, हरिनाम सफ्ताह आणि गाथा प्रवचन या ठिकाणी दरवर्षी आयोजित केले जाते. तिवसा तालुका ही विविध संताची कर्मभूमी आहे. ७ दिवसापासून या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सोटागिर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

गुरुवारी ( २ मे) रोजी सकाळी ९.३० ते १२.३० पर्यंत ज्ञानेश्वर महाराज तायवाडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी शहरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाने लाभ घेतला. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने घराघरातून अन्न गोळा करून या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details