महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shridhar Gavai Hunger Strike : मनपा मल्टीयुटीलिटी रेस्क्यू वाहन खरेदी घोटाळा गाजणार; तक्रारकर्त्याचे उद्यापासून आमरण उपोषण

अमरावती महानगरपालिकेत 2017 मध्ये मल्टीयुटिलिटी वाहन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता. या घोटाळ्यातील दोषींवर अजूनही कारवाई झाली नाही. त्या निषेधार्थ श्रीधर गवई येत्या 26 जानेवारी पासून आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती त्यांनी आज रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Shridhar Gavai Hunger Strike
मनपा मल्टीयुटीलिटी रेस्क्यू वाहन खरेदी घोटाळा

By

Published : Jan 25, 2023, 10:25 PM IST

श्रीधर गवई

अमरावती : श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित केलेल्या पत्र परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, सन 2017 मध्ये तत्कालीन महानगरपालिकेत वाहन खरेदी घेटाळा झाला होता. तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी 25 ते 30 लाख रुपये किमत असलेले मल्टीयुटिलिटी वाहन दोन कोटी पन्नास लाख रुपयात खरेदी केले होते. त्याचे देयक सुद्धा एका दिवसातच अदा केले. हे देयक त्यांनी मल्टीयुटिलिटी वाहन तयार व्हायच्या आगोदर अदा केले होते असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे.

अधिक दराने खरेदी :तत्कालीन मनपा आयुक्त संजय निपाने यांनी नेमली होती चौकशी समिती त्यानंतरच्या काळात तत्कालीन महानगरपालिका आयुक्त संजय निपाणे यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम.जी. कुबडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. एम.जी. कुबडे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. ज्या किमतीत मल्टीयुटिलिटी व्हॅन खरेदी करण्यात आली. त्यामध्ये तीन वाहने महापालिकेला खरेदी करता आली असती. तसेच वाहनात वापरण्यात आलेल्या साहित्याची किंमत खूप जास्त असल्याचे तपासात समोर आले आहे. हा तपास अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. या तपास अहवालात महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त नरेंद्र वानखडे, अग्निशमन विभागाचे तत्कालीन प्रमुख भरतसिंग चव्हाण, तत्कालीन लेखापाल यांच्यासह अन्य दोषी चौकशी समितीला असल्याचे आढळले.

कारवाई नाही :चौकशीचा अहवाल येऊन बरेच दिवस झाले परंतु अजूनही या संदर्भात दोषींवर काहीच कारवाई झाली नाही. या या संबंधित दोषींवर कारवाई व्हावी यासाठी येत्या 26 जानेवारी पासून आमरण उपोषणावर बसणार असल्याचे श्रीधर गवई यावेळी सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी 17 डिसेंबर 2018 रोजी वाहन खरेदी केले. 19 डिसेंबर 2018 रोजी संबंधित कंपनीच्या खात्यात रोख रक्कम जमा केली. एकाच वेळी दोन कोटी रुपयांची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. त्यावेळी वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रीधर गवई यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे केली होती. काही नगरसेवकांनी ही बाब सर्वसाधारण सभेतही मांडली होती.

आमरण उपोषण -मल्टी वाहन खरेदी घोटाळ्यांमध्ये संबधीतांवर कारवाई करावी असे गवळी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही पाठवनार असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज सांगितले की, मल्टीयुटिलिटी रेस्क्यू व्हॅन घोटाळा प्रकरणाचा तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. महापालिकेवर नाराज असलेले तक्रारदार श्रीधर गवई यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Ramdas Athawale On Thackeray, Ambedkar Alliance : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शिवशक्ती, भीमशक्ती म्हणता येणार नाही - रामदास आठवले

ABOUT THE AUTHOR

...view details