अमरावती -उठसुठ कुठलेही वक्तव्य करून चमकोगिरी करणारे भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी फुकट प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीचे विधान करणे बंद केले नाही, तर त्यांना आम्ही दिसेल तिथे त्यांचे कपडे फाडून चोप देवू, असा इशारा शिवसनेने दिला आहे. याबाबत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुढधे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवराय कुळकर्णी यांना सभ्यपणे राहण्याचा सल्ला दिला आहे.
'आमदार, महापौरांजवळ कुळकर्णीची चालत नाही का?'
हिंदू स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी ही भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी स्वतः दिलेल्या निधीतून लावली जात आहे. भाजपाचा आमदार शवदाहिनी देतो, भाजपाचा प्रवक्ता त्याला विरोध करतो. इथे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन करणाऱ्या शिवराय कुळकर्णीला स्मशानभूमीसमोर चमकोगिरी करण्यापेक्षा त्यांच्या आमदार , महापौराला जाब का विचारीत नाही. त्यांच्याजवळ यांची चलती नाही का? असा सवालही पराग गुढधे यांनी उपस्थित केला आहे.
'पाच वर्षात स्मशानभूमीचा विकास नाही'