अमरावती- शहरातील वर्षभर सामाजिक बांधलिकी जोपासत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी अण्णाभाऊ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, यावेळी कोरोनामुळे उपासमार होणाऱ्या लोकांसाठी झटत आहे. संपूर्ण जगावर महामारीचे संकट ओढावले असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अनेक मजूर, निराधार, अपंग, बेसाहारा व्यक्तींपुढे आर्थिक संकट आल्यामुळे त्यांच्या पोटाची भूक कशी भागेल? याचा विचार करत या संस्थेने संत गाडगेबाबा यांच्या नावाने १ एप्रिलपासून अन्नछत्र चालू केले.
संत गाडगेबाबा अन्नछत्राकडून दररोज ३०० गरजूंना जेवण वाटप
अमरावतीमध्ये वर्षभर सामाजिक बांधलिकी जोपासत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी अण्णाभाऊ मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, यावेळी कोरोनामुळे उपासमार होणाऱ्या लोकांसाठी झटत आहे.
सॅनिटायझरने फवारणी करून सर्व सहकारी दुपारी ३ वाजल्यापासून जेवण बनविणे चालू करतात. आठवड्यातून १ दिवस गोड पदार्थ दिला जातो. संपूर्ण युवक मंडळी घरामध्ये असताना ही ध्येयवेडी युवकमंडळी गरजवंताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. तसेच पूर्ण लॉकडाऊन संपेपर्यंत या गोरगरिबांची अविरत सेवा करण्याचा या संस्थेच्या सहकार्यांचा मानस आहे. सोबतच शहरातील दानदात्यांचा या संस्थेच्या पदाधिकार्यांवर असलेल्या विश्वासावर दानदाते मदत करित आहेत. जवळपास ५० युवकांची फळी या संस्थेजवळ आहे. प्रशासनाच्या नियमाची काटेकोरपणे अंबलबजावणी करत नियमाने ६ दुचाकी घेऊन शहरामध्ये जेवण पोहोचवत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अक्षय गवळी यांनी दिली.
या दैनंदिन कामामध्ये संस्थेचे चेतन सारंदे, अमोल पुकळे, प्रतिक आंबेकर, आकाश फाटे, संतोष देशमुख, आकाश येऊल, शेखर लोणकर, आकाश बुंदेले, गौरव नेमाडे, सचिन अग्रवाल, अक्षय काळमेघ,अंकीत सारंदे,सुशांत देशमुख,तुषार शर्मा,वैभव काळमेघ,अनुप भावे,नागेश हातेकर,रुपेश बुंदेले,सुमीत भावे,संकेत बेलसरे,पवन बोरसे,अंकुश होटे,विक्की पाटिल,रोहित खोब्रागडे,नितीन परकाले,सक्षम पुनासे,उत्कर्ष झाडे,हर्षल पहाडे,सागर शेंडे,अल्पेश सोनटक्के,प्रसाद काकड,भुषन काळमेघ,करण शेंडे,तुषार गवळी आदि सहकारी मेहनत घेत आहेत.