अमरावती -अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका 12 वर्षीय आदिवासी मुलीवर एका 34 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तासाभरातच पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका 12 वर्षीय आदिवासी मुलीवर एका 34 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तासाभरातच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक
जिल्ह्यात संतापाची लाट
पीडित मुलगी व आरोपी एका गावातले असून, तिला गावाजवळील एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. विठ्ठल कामठे असे या 34 वर्षीय आरोपीचे नाव आहे. दरम्यान आरोपीविरोधात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात संतापांची लाट पसरली असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.