अमरावती- राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू झाला असला तरीदेखील जनावराचे अनेक ट्रक महामार्गावरुन जात असतात. अशातच आज (गुरुवार) अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांनी तळेगाव ठाकूर नजीक 52 जनावरे घेऊन जाणार ट्रक पाठलाग करून पकडला.
अमरावतीच्या तिवसाजवळ जनावरांना घेऊन जाणारा ट्रक पकडला; 51 जनावरांची सुटका
आज सकाळी दहाच्या सुमारास तिवसा पोलिसांना दिवाणी फौजदारी न्यायालयासमोर राष्ट्रीय महामार्गावरून एक संशयास्पद ट्रक जाताना आढळला. त्यानंतर तात्काळ तिवसा पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. ट्रक चालकाला पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच ट्रक सोडून चालक-वाहक फरार झाले.

(एमएच 27 एक्स 7770) हा ट्रक नागपूरवरुन अमरावतीच्या दिशेने जात होता. पोलिसांनी या ट्रकची तपासणी केली असता यामध्ये गोवंश जातीचे 52 जनावरे होती. एकूण मुद्देमाल दहा लाख रुपयांचा होत .पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून जनावरे हे जवळील एका गोरक्षा केंद्रात पाठवली आहेत.