अमरावती -जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघातील चित्र दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. एकीकडे बडनेरा मतदारसंघाची निवडणूक ही शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड यांच्यामुळे रंगतदार झाली आहे. अशातच रवी राणा यांचा गड समजल्या जाणाऱ्या बडेनराच्या जुन्या वस्तीत राणा यांना काहीसा विरोध होताना पहायला मिळत आहे.
बडेनरा मतदारसंघातील जुन्या वस्तीत आमदार रवी राणा यांना विरोध करण्यासाठी तरूणांकडून घोषणाबाजी हेही वाचा... नागपूरचं बोचकं परत नागपूरला पाठवा, अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बडनेरा मतदारसंघात मुस्लीम समाज मोठया प्रमाणावर आहे. अशातच मुस्लीम समाज हा काही प्रमाणात रवी राणा यांच्या विरोधात गेला असल्याचे बोलल्या जात आहे. तर उच्चशिक्षित असलेल्या तरुण उमेदवार राणी पाटील या सुद्धा याच मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहे. उमेदवार रानी पाटील ह्या प्रचार करत असताना रवी राणा विरोधात काही नागरिकांनी 'राणा को हटाओ राणी को लाओ' अशा घोषणा राणी पाटील यांच्या समर्थनार्थ दिल्याचेसमोर आले आहे.
विद्यमान आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन खासदार झाल्या. तेव्हा नवनीत राणा लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान मोदी सरकार विरोधात बोलत होत्या. मात्र विजयानंतर नवनीत राणा यांनी 370 कलमचे समर्थन करत मोदी सरकारचे गुणगान गायले होते. त्यामुळे पत्नी नवनीत राणा यांच्या वक्तव्याचे पडसाद आता पती रवी राणा यांच्या निवडणूक प्रचारात पडत आहे.
हेही वाचा... भाजप-सेना हे मस्तावलेले सरकार - प्रकाश आंबेडकर