अमरावती -कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दहशतीच्या सावटाखाली असताना राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद आहेत. विद्यापीठांनी आपल्या परीक्षा कोरोनाच्या स्थितीत पुढे ढकलल्या तर काही परिक्षा रद्द केल्या आहेत. कोरोनाचा प्रसार होऊ नये आणि विद्यार्थी सुरक्षित राहावे यासाठी शासन, प्रशासन खबरदारी घेत असताना अमरावती शहरातील दंत महाविद्यलयाने विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन प्रत्यक्षिक परीक्षा घेतल्या असून यामुळे सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडवीत विद्यार्थी एकत्र आले आहेत. हा प्रकार गंभीर असून विद्यार्थी आणि पालक महाविद्यलयाच्या निर्णयामुळे भयभीत झाले असून कोणी तरी आमच्या अधिष्ठात्याना समजावा अशी मागणी त्यांच्या कडून होत आहे.
प्रयोगशाळेत शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी
आज (दि. 20 एप्रिल) प्रॅक्टिल एक्झाम आल्याने 35 ते 40 विद्यार्थी प्रयोगशाळेत एकत्र आलेत. यावेळी प्रयोगशाळेत चांगलीच गर्दी झाली. सोशल डिस्टनसिंग ठेवा, असे म्हणत विद्यार्थी हास्य विनोदही करत होते. आम्हाला ऑफलाइन परीक्षेला बोलावले हे आम्हला पटलेले नाही. पण, करणारे काय अशा प्रतिक्रिया विद्यार्थी देत होते. मात्र, प्राध्यापकांच्या धाकाने कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे धाडस विद्यार्थ्यांना केले नाही.