अमरावती- कोरोनामुळे संपूर्ण व्यवस्था जेरीस आली आहे. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. परंतु, अमरावती शहरात पठाण चौक, जमिल कॉलनी या भागात खरेदीसाठी रात्री चक्क यात्रा भरत असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे कोरोना नियमांची पायामल्ली होत आहे.
रमझान ईदच्या तयारीसाठी गर्दी
14 मे रोजी रमझान ईद असल्याने शहरातील इतवारा बाजार, पठाण चौक, जमिल कॉलनी आदी भागात मेवा, मिठाई, फळं आणि कपड्यांची दुकानं थाटली आहे. दिवसा या ठिकाणी शांतता दिसते. परंतु रात्री नागरिक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरात मोठी गर्दी करत आहेत.