मेळघाटात खासदार नवनीत राणांचे होळी निमित्त आदिवासी नृत्य
मागील ११ वर्षांपासून मेळघाट मध्ये आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे आदिवासींबरोबर होळी साजरी करतात. यंदाही होळीच्या निमित्ताने नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत प्रसिद्ध कोरकू नृत्य करत होळीचा आनंद लुटला आहे.
अमरावती - राज्यभरात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने यावर्षी होळी अतिशय साध्या पध्दतीने व घरीच साजरी करण्याचे आवाहन राज्य सरकाराने केले होते. आदिवासी बांधवांचा उत्साह मात्र दरवर्षीसारखाच कायम आहे. कालपासून मेळघाटामध्ये होळी सणाला सुरवात झाली आहे.आदिवासी समाजात होळीला महत्व आहे.दरम्यान मागील ११ वर्षापासून मेळघाट मध्ये आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे आदिवासींबरोबर होळी साजरी करतात. यंदाही होळीच्या निमित्ताने नवनीत राणा यांनी आदिवासी महिलासोबत प्रसिद्ध कोरकू नृत्य करत होळीचा आनंद लुटला आहे.चार दिवस नवनीत राणा या मेळघाटमध्ये शेकडो गावांना भेटी देत आदिवासी बांधवांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.