महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिवळा पळस वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींचे सुरक्षा कवच

अमरावती-मार्डी मार्गावर मार्डीपासून २ कि.मी. आधी रस्ता रुंदीकरणामुळे अडचणीत सापडलेले पिवळ्या पळसाचे झाड जगावे यासाठी 'ईटीव्ही भारत' ने  वृत्त दिले होते.  याची दखल घेत सेवानिवृत्त वन अधिकारी विजय भोसले यांच्यासोबत अनेक निसर्गप्रेमी समोर आले आहेत.

By

Published : Mar 21, 2019, 4:49 PM IST

पळसाचे झाड तुटणार नाही यासाठी झाडाच्या मुळा खालून एका बाजूला खचलेली माती श्रमदानाद्वारे भरण्यात आली.

अमरावती -अतिशय दुर्मिळ असणारा पिवळा पळस अमरावती-मार्डी रस्ता रुंदीकरणात नामशेष होण्याच्या मार्गावर असताना या वृक्षाला जीवनदान मिळावे यासाठी सेवानिवृत्त वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमींनी सुरक्षकवच निर्माण केले आहे. हे झाड तुटणार नाही यासाठी झाडाच्या मुळा खालून एका बाजूला खचलेली माती श्रमदानाद्वारे भरण्यात आली. आज जागतिक वन दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला.

पिवळा पळस वाचविण्यासाठी निसर्गप्रेमींनी झाडाला सुरक्षा कवच केले

अमरावती शहरालगत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यामागे मार्डी मार्गावर मार्च महिन्याच्या भर उन्हात नारंगी फुलांच्या शेकडो झाडांमध्ये तीन ठिकाणी पिवळ्या रंगाचा पळस डोळ्यात भरतो. मार्डी मार्गावरील तीन पैकी पिवळ्या रंगाच्या पळसाचे एक वृक्ष रस्ता रुंदीकरणाच्या कामात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इतर दोन मात्र मुख्य मार्गापासून काही अंतर आतमध्ये आहेत.

अमरावती-मार्डी मार्गावर मार्डीपासून २ कि.मी. आधी रस्ता रुंदीकरणामुळे अडचणीत सापडलेले पिवळ्या पळसाचे झाड जगावे यासाठी 'ईटीव्ही भारत' ने वृत्त दिले होते. याची दखल घेत सेवानिवृत्त वन अधिकारी विजय भोसले यांच्यासोबत अनेक निसर्गप्रेमी समोर आले आहेत. वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे मार्डी मार्गावरील पिवळा पळस रस्ता रुंदीकरणातून कसे वाचू शकेल यासाठी पाठपुरावा सुरू झाला. यामुळे हे वृक्ष वाचेल अशी आशा निर्माण झाली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनाही हे वृक्ष वाचावे यासाठी विनंती करण्यात आली असून पालकमंत्र्यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

आज श्रमदानानंतर या वृक्षाची पूजाही करण्यात आली. आज जागतिक वनदिनाच्या पर्वावर विजय भोसले, उल्हास मराठे, यादव तरटे, श्याम देशपांडे, इंद्राप्रताप ठाकरे, संजय जगताप, किशोर देशमुख, रवींद्र मराठे, माधव गिरी, संजय पालवे, प्रकाश लढ्ढा आदी या श्रमदानात सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details