अमरावती -देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या विश्वासावर विश्वास ठेवत तसेच देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांचे कुशल संघटन बुद्धिकौशल्य तसेच भाजपच्या टीमवर्कमुळे राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले, अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे नवनियुक्त सदस्य डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde ) यांनी दिली. आमच्या विजयासाठी भाजपचे सर्व आमदार तसेच सर्व अपक्ष आमदार यांनी साथ दिली. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांनी आजारी असतानाही मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवरांच्या विजयासाठी सर्वांच्या शुभेच्छा कामी आल्या, असेही बोंडे यांनी म्हणाले आहे.
भाजपच्या टीमवर्कमुळे हे यश मिळाल - डॉ. अनिल बोंडे
देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्त्वात काही खास गुण आहेत की ज्यांनी सरकार स्थापनेसाठी महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला होता. तेही भाजपकडे आकर्षित झालेत आणि त्यांनी सदसद विवेकबुद्धीने मतदान केले आणि विजय प्राप्त करून दिला, असे खासदार डॉ. अनिल बोंडे ( Anil Bonde ) यांनी म्हणाले आहे.
डॉ. अनिल बोंडे
विरोधकांनीही दिली साथ -देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात काही खास गुण आहेत की ज्यांनी सरकार स्थापनेसाठी महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला होता. तेही भाजपकडे आकर्षित झालेत आणि त्यांनी सदसद विवेकबुद्धीने मतदान केले आणि विजय प्राप्त करून दिला, असेही डॉ. बोंडे यांनी म्हणाले आहे.