रवी राणा यांची प्रतिक्रिया अमरावती : आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा एका पावसाळी बेडकासारखा आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडून ते मातोश्रीवर बसले राहत होते. कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. मात्र आता ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येऊन जनतेला मतांची भीक मागत असल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. ठाकरे लोकांची दिशाभूल करत आहे. मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे काही करू शकले नाहीत.
जो श्रीराम का नही वह किसी काम का नही : आता तर तुमचे 40 आमदार गेले, सत्ता गेली. एवढेच नव्हे तर, संपूर्ण शिवसेना पार्टी तुमच्या ताब्यातून निसटून गेली आहे. हनुमान चालीसाचा विरोध करून एका खासदार आमदाराला तुम्ही तुरुंगात टाकले." जो प्रभू श्रीराम का नही, हनुमान का नही, वो किसी काम का नही". अशी टीका देखील राणा यांनी ठाकरे यांच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरे घेणार आढावा :आज उद्धव ठाकरे दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आले आहेत. ते १० जुलै रोजी अमरावती, अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते दोन्ही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांना संबोधित करतील. शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे अमरावती जिल्ह्यात येत असल्याने शिवसैनिक तयारीला लागले आहेत.
असा आहे ठाकरेंचा दौरा : राज्यात शिवसेनेमधील स्थित्यंतरानंतर जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य राहिली. या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासोबतच काही टिप्स सुद्धा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा पूर्व आढावा घेण्यासाठी खासदार अरविंद सावंत आणि खासदार विनायक राऊत काल रात्रीच अमरावतीत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांचे ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आगमन होईल. त्यानंतर १० तारखेला सकाळी ११ ते १२ या वेळेत अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी व १२ ते १ दरम्यान अकोला जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे संवाद साधतील व त्यानंतर दुपारी १ ते २ या दरम्यान दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांना संबोधित करणार आहे.
हेही वाचा -Uddhav Thackeray Vidarbha visit: पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही-उद्धव ठाकरे