अमरावती -रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. त्यांनी वरखेड मार्डा जहांगीरपूर अंजनसिंगी प्रजिमा ३९ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, यावली डवरगव्हाण मोझरी रस्ता ३०८ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे व डवरगाव मोझरी वऱ्हा रस्त्याची सुधारणा करणे, अशा एकूण साडेनऊ कोटींच्या रस्ते विकासकामांचे भूमीपूजन केले. यावेळी प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला दिले.
या गावांना मिळणार लाभ -
तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील वरखेड, मार्डा, जहागीरपूर, मालधूर, गुरुकुंज मोझरी, नांदगावपेठ, खोलापूर, टाकरखेडा संभू परिसरातील विविध गावे, खेड्यापाड्यातील नागरिकांना या विकासकामांचा लाभ होणार आहे.
यांची होती उपस्थिती -
यावेळी जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पूजा आमले, तिवसा पंचायत समिती सभापती श्रीमती शिल्पा हाडे, उपसभापती शरद वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता विभावरी वैद्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मोझरी गावातील रस्ते होणार रुंद -
मोझरी बसस्थानकापासून मोझरी गावापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण होणार असल्याची माहिती अभियंता श्रीमती वैद्य यांनी दिली.
हेही वाचा -उद्धव ठाकरेंना कळेल त्यांचा ओसामा काय करीत होता; वझेंवरून सौमेयांचा निशाणा