अमरावती - अंजनगाव सुर्जी-कोरोणा व्हायरसचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण राज्यात जिल्हाबंदी असतांना दोन जिल्हे ओलांडून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणे सुरू आहे. याबाबत विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी संबंधित जिल्हा प्रशासनास कारणे दाखवा नोटीस का बजावीत नाही असा संतप्त सवाल स्थानिक जनता करीत आहे.
सध्या राज्यात लॉकडाऊन सूरु असून पहिला २१ दिवसाचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपल्यांनतर ३ मे पर्यंत पुन्हा वाढवण्यात आला आहे. या काळात राज्यातील सर्व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तरीही दि.१५ ला सायकांळी ५ वाजता अकोट अंजनगांव रस्त्याने काही मजूर आपल्या मुलाबाळासह येत असल्याचे लखाड येथील पोलीस पाटलांना दिसले. त्यावर त्यांनी गटविकास अधिकारी यांना माहिती दिली आणि त्या सर्व पायी येणाऱ्या मजूरांना अंजनगांव सूर्जी येथील नगरपरिषद शाळेच्या तात्पूरत्या निवारा केंद्रात ठेवण्याचे आदेश तहसीलदार अंजनगांव यांनी दिले.
मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या १९ लोकांच्या जेवणाची व्यवस्था अंजनगांव सूर्जी येथील सामाजीक कार्यकर्ते करीत आहे. परंतू संपूर्ण जिल्ह्याच्या सिमा बंद असतांना हे मजूर अंजनगांव सूर्जीपर्यंत आलेच कसे. त्यातही बुलडाणा हा जिल्हा कोरोना व्हायरसचा हाटस्पॉट असतांना बुलडाणा आणि अकोला या दोन जिल्ह्याच्या सीमा ओलांडत असतांना पोलिसांनी त्यांना हटकले नाही का? अमरावती जिल्ह्यात प्रवेश करीत असतांना अंजनगांव पोलीसांच्या जिल्हाबंदी चौकीवर त्यांची विचारपूस झाली नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
यापूर्वीसुद्धा पुणे येथून 12 ते 13 युवक मालवाहू गाडीने बाळापूरपर्यंत आले होते. बाळापूर येथून आकोट मार्ग अंजनगाव सुर्जीला पायी आले होते. रात्री दहा वाजता दरम्यान हे दहा ते बारा युवक बैतूल करिता परतवाडा मार्ग रात्रीच्यावेळी पायी निघाले होते. त्याबाबतची सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. जिल्हा बंदी असताना जिल्ह्याची हद्द ओलांडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीमध्ये बिनधास्तपणे लोकांचे येणे सुरू आहे. याबाबत संबंधित जिल्हा प्रशासनास विभागीय स्तरावरचे अधिकारी याबाबत संबंधित जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही.
दोन जिल्हे ओलांडून लोक येत असतांना, त्या ठिकाणची जिल्हा प्रशासन या लोकांना जागीच का थांबवत नाही. जिल्हा बंदी असताना त्यांना अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत कसे काय प्रवेश करू देतात, असे अनेक प्रश्न निर्माण होत असून विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण गंभीर बाबीची दखल का घेत नाही आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनास जाब का विचारीत नाही, असा संतप्त सवाल जनतेत होत आहे. दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाही का करण्यात येत नाही, हा प्रश्न सुध्दा उपस्थित होत आहे. मग मग लॉक डाऊन, संचारबंदी, जिल्हा बंदी मला अर्थ काय असा प्रश्न सुद्धा सुद्धा जनतेत होत आहे.