अमरावती -नुकत्याच विधानसभा निवडणुका आटोपल्या आहेत आणि आता दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठा या आकर्षक अशा वस्तूंनी सजल्या आहेत. अशातच यावर्षी चिनी वस्तूंना नाकारत आपल्या स्वदेशी वस्तूकडे लोकांचा कल हा वाढलेला आहे.
अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती
गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांसाठी दिवाळा हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. रांगोळी, मातीचे विविध दिवे, आकाश कंदील यांची प्रथा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या दिव्यांना ना पसंती दर्शवली आहे.
हेही वाचा -दिवाळीनिमित्त बाजारात आले वाजवण्याचे नव्हे खाण्याचे फटाके!
गरीब आणि श्रीमंत अशा सर्वांसाठी दिवाळा हा अतिशय महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठा सुद्धा सजल्या आहेत. रांगोळी, मातीचे विविध दिवे, आकाश कंदील यांची प्रथा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या दिव्यांना ना पसंती दर्शवली आहे. चिनी बनावटीच्या लायटिंगला देखील लोकांची नापसंती दिसते आहे. दिवाळी ही 2 दिवसांवर असल्याने बाजारपेठेतील किराणा दुकान, कापड दुकान, मॉल, फाटका दुकान, आदी दुकाने सजली आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत आहे.