महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Landslides In Amravati district: अमरावती जिल्ह्यात या गावी भूस्खलन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वाचावरण

जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सुकळी नागरिक भूस्खलनाने पूर्णतः हादरले आहेत. भूस्खलनाने नदी काठच्या परिसरातील घरे कधी खचून जमीनदोस्त होतील, या भीतीने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. सुकळी हे दर्यापूर तालुक्यातील शेवटचे गाव असून येथे सन २०१३ पासून मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे.

अमरावती जिल्ह्यातील सुकळी येते भूस्खलन
अमरावती जिल्ह्यातील सुकळी येते भूस्खलन

By

Published : Sep 17, 2022, 3:44 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सुकळी नागरिक भूस्खलनाने पूर्णतः हादरले आहेत. भूस्खलनाने नदी काठच्या परिसरातील घरे कधी खचून जमीनदोस्त होतील, या भीतीने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. सुकळी हे दर्यापूर तालुक्यातील शेवटचे गाव असून येथे सन २०१३ पासून मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे.

गावाभोवताल नदीकाठाची जमीन खचत असल्याने जवळपास गावातील ३० टक्के जमीन भूस्खलनाने खचलेली आहे. भूस्खलनाने नदीकाठच्या परिस्थितीत घरे कधी खचून जमीन दोस्त होतील या भीतीने सुकळी येथील ग्रामस्थांनी धास्ती घेतली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात सुकळी येथील गावाभोवतालच्या जमिनीस भेगा पडत असून पाऊस पडल्यानंतर जमिनीचा भाग भुसखलनाने खचत असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

आमदार बळवंत वानखडे यांनी या सर्व परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच, यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार डॉ. योगेश देशमुख उपविभागीय अभियंता आडे, अचलपूरचे मध्यम व लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता सुमित हिरेकर यांच्यासह त्यांनी भूस्खलन होणाऱ्या भागाची पाहणी केली. दरम्यान, त्यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी पवनित कौर यांच्याशीही मोबाईलवर संपर्क साधून तात्काळ बैठक आयोजित करण्याची विनंती यावेळी आमदार वानखडे यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details