महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्याघ्र प्रकल्प अनलॉक : चिखलदऱ्यात जंगल सफारीला परवानगी

मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे आजपासून अनलॉक होणार आहेत. यामध्ये मेळघाट बरोबरच पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधेरी प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा प्रकल्पातील पर्यटन सुरू करण्यात व जंगलसफारी सुरू करण्यास वनविभागाने हिरवा झेंडा दाखवल्याने आता वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

By

Published : Jun 25, 2021, 12:28 PM IST

चिखलदरऱ्यात जंगल सफारीला परवानगी
चिखलदरऱ्यात जंगल सफारीला परवानगी

अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील अनेक महिन्यापासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या चिखलदऱ्यातील वैराट जंगल सफारी ही बंद करण्यात आली होती. परंतू ही जंगल सफारी बंद असल्याने येथील जिप्सी चालक, वाहक गाईड यांना अर्थिक फटका बसत होता. तर पर्यटकांचा देखील हिरमोड होत होता. त्याच पार्श्वभूमीवर आता कोरोना नियमांचे पालन करून आजपासून ही जंगल सफारी सुरू करण्याची परवानगी वनविभागाकडून देण्यात आली आहे.

चिखलदरऱ्यात जंगल सफारीला परवानगी

जंगलसफारी सुरू करण्यास वनविभागाचा हिरवा झेंडा

मेळघाट बरोबरच राज्यभरातील सर्वच व्याघ्र प्रकल्प हे आजपासून अनलॉक होणार आहेत. यामध्ये मेळघाट बरोबरच पेंच व्याघ्र प्रकल्प, ताडोबा अंधेरी प्रकल्प, चंद्रपूर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा प्रकल्पातील पर्यटन सुरू करण्यात व जंगलसफारी सुरू करण्यास वनविभागाने हिरवा झेंडा दाखवल्याने आता वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

विदर्भाचा काश्मीर चिखलदरा

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भात पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यामध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज पुन्हा चिखलदऱ्यात पहाटे दाट धुके पसरले होते. या घनदाट धुक्यात पर्यटक मात्र मनसोक्तपणे आनंदात बेधुंद होताना दिसून आले. विदर्भाचा काश्मीर असलेले चिखलदरा आता पर्यटकांच्या गर्दीने फुलले आहे. अलीकडच्या काळातच कोरोनाची रुग्णसंख्या घटली असल्यामुळे पर्यटनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. चिखलदऱ्यातील भीमकुंड पॉईंट वरील मुख्य धबधबा हा अलीकडच्या काळात प्रभावित झाला आहे. देवी पॉईंट वरील धबधबा हा सुद्धा ओसंडून वाहू लागला आहे. तसेच डोंगरदऱ्यातून वाहणारे छोटे,मोठे धबधबे हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे हजेरी लावून. या निसर्ग सृष्टीचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे.

चिखलदारामध्ये सर्वाधिक पाऊस
दरवर्षी पावसाळ्यात इतर ठिकाणच्या तुलनेत चिखलदारामध्ये पाऊस हा सर्वाधिक होत असतो. यंदाच्या पावसाळ्यात विदर्भाचा कश्मीर असलेल्या चिखलदरात तब्बल 175 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरवर्षी येथे पंधराशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस होतो. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांची गर्दी ही सर्वाधिक राहते. पावसात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त पर्यटक चिखलदारा मध्ये दाखल होत असतात.

हेही वाचा- औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळ 17 जूनपासून पर्यटकांसाठी होणार खुली

ABOUT THE AUTHOR

...view details