महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'

दिल्लीमध्ये रविवारी भाजपच्या कार्यालयात आज 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपचे नेते भगवान गोयल यांनी या पुस्तक प्रकाशनाची माहिती दिली होती. त्यानंतर या पुस्तकावरून अनेक जणांनी संतापाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री
जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री

By

Published : Jan 12, 2020, 11:15 PM IST

अमरावती- भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यात राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत माझी लायकी काय आहे, हे स्वतःला कळलं पाहिजे. मोदींनी यावर स्वतः नकारात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे, हा शिवाजी महाराजांच्या मातीचा अपमान असल्याची टीका केली आहे.

दिल्लीमध्ये रविवारी भाजपच्या कार्यालयात आज 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपचे नेते भगवान गोयल यांनी या पुस्तक प्रकाशनाची माहिती दिली होती. त्यानंतर या पुस्तकावरून अनेक जणांनी संतापाची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही तीव्र शब्दात संताप व्यक्त करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपीत शिवाजी महाराज होणार नसल्याचेही ट्विट करत "आज के शिवाजी नरेंद्र मोदी" हे मनाला पटत नसल्याचे स्पष्ट केले. याच बरोबर स्वत:ची लायकी समजायला हवी, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मोदींवरही निशाणा साधला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details