अमरावती - विद्यार्थिनींनी स्वावलंबनाने आत्मविश्वास वाढवावा कोणत्याही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. तो आत्मविश्वास केवळ संरक्षणाचे धडे घेऊनच वाढू शकतो असा विश्वास मराठी सिने अभिनेत्री दामिनी फेम प्रतीक्षा लोणकर यांनी विध्यार्थ्यांना दिला.
ब्युटी पार्लरमध्ये जाऊन नाही, तर संरक्षणाचे धडे घेऊनच वाढ शकतो आत्मविश्वास - अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर
चांदुर बाजारमध्ये लक्ष प्रतिष्ठानच्या वतीने 3 तालुक्यातील तब्बल 21 हजार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाची उद्घाटन सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना विद्यार्थिनींनी स्वावलंबनातून आत्मविश्वास वाढवावा आणि हा आत्मविश्वास केवळ संरक्षणाचे धडे घेऊनच वाढू शकतो असा विश्वास लोणकर यांना व्यक्त केला.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजारमध्ये लक्ष्य प्रतिष्ठानच्या वतीने सुरेखा ठाकरे यांच्या पुढाकाराने सोमवारपासून 3 तालुक्यातील तब्बल 21 हजार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी लोणकर यांनी प्रशिक्षणार्थी सोबत प्रात्यक्षिक देखील सादर केले. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत घेण्यात आलेल्या कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम अत्यंत वेगळा असल्याचेही लोणकर म्हणाल्या. तसेत हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार ही त्यांनी यावेळी मानले.
हेही वाचा - अमरावतीत बहरले 'रोझ गार्डन', रविवारी होणार लोकार्पण