अमरावती - कोरोनामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्व क्षेत्राला बसला असताना यातून शेती व्यवसायसुद्धा सुटला नाही. ऐन उन्हाळ्यात कोरोनाचे सावट आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचा उभा गहू शेतात पडून आहे. तर, दुसरीकडे शेतीच्या मशागतीची सर्व कामे ठप्प झाली आहे. दरम्यान नाफेडमध्ये विकलेल्या मालाचे अद्याप पैसे मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
लॉकडाऊनमूळे शेतीची कामे रखडली, अर्धा उन्हाळा संपत आला असतानाही मशागत नाही
कोरोनाचे भूत हे देशाच्या मानगुटीवर बसले असल्याने शेतात रक्त ओकणाऱ्या शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे. कापूस आणि सोयाबीनने यावर्षी शेतकऱ्यांचे चांगलेच तेल काढले. कापूस आणि तूर बाजारपेठमध्ये विक्रीसाठी नेण्याच्या कालावधीत कोरोनाने भारतात शिरकाव केल्याने राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितींना टाळे लागले आहे. आधीच बाजारभाव नाही त्यात बाजारपेठ बंद असल्याने लाखो शेतकऱ्यांचा शेतमाल तसाच घरी पडून आहे.
यावर्षी शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना पुरते गारद केले आहे. त्यात आता कोरोनाचे भूत हे देशाच्या मानगुटीवर बसले असल्याने शेतात रक्त ओकणाऱ्या शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसत आहे. कापूस आणि सोयाबीनने यावर्षी शेतकऱ्यांचे चांगलेच तेल काढले. कापूस आणि तूर बाजारपेठमध्ये विक्रीसाठी नेण्याच्या कालावधीत कोरोनाने भारतात शिरकाव केल्याने राज्याभरातील कृषी उत्पन्न बाजार समितींना टाळे लागले आहे. आधीच बाजारभाव नाही त्यात बाजारपेठ बंद असल्याने लाखो शेतकऱ्यांचा शेतमाल तसाच घरी पडून आहे.
अलीकडे आता दोन महिने गेले की पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत असते. त्यासाठी एप्रिल महिन्यात शेतीची मशागत करणे गरजेचे आहे. पण, शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने अद्यापही शेतीची मशागत रखडलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक संत्रा उत्पादन घेतल्या जाते. परन्तु, मृग बहाराचा संत्रा काढणीला आला असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्र्याच्या आंतरराज्यात होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला असल्याने संत्र्याचे अर्थकारण हे डबघाईला आले आहे. सध्या आंबिया बहाराचा संत्रा घेण्यासाठी शेतकरी या वेळेला फवारणी करत असतात. परन्तु, लॉकडाऊनमुळे कृषी मालाची दुकानेही बंद असल्याने संत्रा झाडांच्या मशागतीची कामे ही थांबली आहे.