अंजनगाव सुर्जी (अमरावती) - 'हरभऱ्याच्या नोंदीसाठी सातबाराची पंचाईत' ही बातमी 'ईटीव्ही भारत'वर प्रकाशीत झाली होती. त्यानंतर अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदारांनी सर्व तलाठ्यांना सातबाराबाबत आदेश काढले आहेत. कोरोनामुळे मधे लॉकडाऊन झाल्याने या काळात शासनातर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीच्या नोंदी बंद करण्यात आल्या होत्या.
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: तहसीलदारांचा आदेश, शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या नोंदीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत
'हरभऱ्याच्या नोंदीसाठी सातबाराची पंचाईत' ही बातमी 'ईटीव्ही भारत'वर प्रकाशीत झाली होती. कोरोनामुळे मधे लॉकडाऊन झाल्याने या काळात शासनातर्फे खरेदी करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीच्या नोंदी बंद करण्यात आल्या होत्या. ईटीव्ही भारत इम्पॅक्टनंतर शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या नोंदीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शासनाने शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन पुन्हा हरभऱ्याच्या नोंदीसाठी 30 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणीकरीता मुदत दिली आहे. मात्र, संचार बंदी सुरू असल्याने सेतू केंद्र बंद आहेत. मुख्यालय तलाठी मिळत नसल्याने हरभऱ्याच्या नोंदणीकरीता सातबाराबाबत शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. काल (4 एप्रिल) संबंधीत बातमी 'ईटीव्ही भारत'वर प्रकाशीत होताच तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी हरभरा सातबारा नोंदीबाबत सर्व तलाठ्यांना सातबारा देताना, विशिष्ट अंतर ठेवून शेतकऱ्यांना सातबारा देण्याबाबत कारवाई करण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत.