अमरावती -मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
डॉ. अनिल बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी; युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे.
डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी शहरातील राजकमल चौक येथे ढोल ताशांच्या नादासह फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी युवास्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाचत आनंद साजरा केला आहे.
दरम्यान, प्रवीण पोटे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत डॉ. अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे युवास्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. पक्षाच्या नगरसेवक सुमती ढोके, आशिष गावंडे, शहर अध्यक्ष संजय हिंगासपुरे, पराग चिमोटे, अभिजित देशमुख यावेळी उपस्थित होते.