महाराष्ट्र

maharashtra

लॉकडाऊन काळाची गरज, पण गोरगरिबांच्या पोटाचा विचार करा - आमदार रवी राणा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्वपक्षीय व्हिडिओ कॉन्फरन्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. यामध्ये आता लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचविले आहे. त्यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपले मत व्यक्त केले. टाळेबंदी करताना गरिबांचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

By

Published : Apr 11, 2021, 7:04 PM IST

Published : Apr 11, 2021, 7:04 PM IST

ravi rana on lockdown
लॉकडाऊन रवी राणा मत

अमरावती -राज्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्वपक्षीय व्हिडिओ कॉन्फरन्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. यामध्ये आता लॉकडाऊन केल्याशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुचविले आहे. त्यावर अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपले मत व्यक्त केले. टाळेबंदी करताना गरिबांचा विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले.

माहिती देताना आमदार रवी राणा

हेही वाचा -चांदुर रेल्वे येथे कोरोना लसीचा तुटवडा; शिबिरातून अनेक नागरिक लस न घेताच परतले

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, टाळेबंदी करा, मात्र गोरगरीब नागरिकांचा यामध्ये विचार व्हायला हवा. टाळेबंदी केली तर अनेकांच्या हाताची कामे बंद होतील. सोबतच राज्यात विजतोडणी सत्र सुरूच आहे. किमान वीजबिलात ५० टक्के सूट द्यावी. गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी. तरच टाळेबंदी केली तर कुणाचीही हरकत राहणार नसल्याचे मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले.

अमरावतीच्या इतवारा चौकात वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा

राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिल पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. सोबतच शुक्रवार ते सोमवार पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे. याला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळत असतानाच अमरावतीतील इतवारा भागात मात्र लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला आहे. नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे, अमरावतीतल्या एका भागाला वेगळा नियम आणि अमरावतीतील इतवारा भागाला वेगळा का? असा सवाल उपस्थित होत आहे.

हेही वाचा -नागपूरसह इतर राज्यातील कोरोना रुग्ण उपचारांसाठी अमरावतीत

ABOUT THE AUTHOR

...view details