अमरावती - जिल्ह्यातील चांदुरबाजार व अचलपूर तालुक्यातील शेतात शंखू अळीचा (गोगलगाय) प्रादुर्भाव वाढला आहे. ही अळी संत्रा, सोयाबीन, कपाशी, अशा पिकांवर आढळत आहे. यामुळे या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. किटकनाशक फवारुनही या गोगलगायपासून सुटका मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यात शंखू अळीचा प्रादुर्भाव
अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात शेतातील पिकांवर शंंखू अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. किटकनाशक फवारणी करुनही यावर उपाय निघत नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.
तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांच्या नशिबाला चिकटलेल्या शंखू अळीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञाचे पथक आले. शेतकऱ्यांची समूह प्रात्यक्षिक झाली. मात्र, गोगलगायीला शेताबाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांंवरच आर्थिक ताण येत आहे. कधी न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर, माळावर, शेतात मुक्त संचार करते. तिच्यात चंचलपणा नसला तरी त्याचे अस्तित्व आहे. सध्या या गोगलगायीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या गोगलगायीने धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री बच्चू कडू यांनी या पिकांची पाहणी केली आहे.