अमरावती- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीला पूर आला आहे. मेळघाटात पूर परिस्थिती असताना या भागात नदीवर बांधण्यात आलेल्या पुलांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे उघड झाले असून प्रशासनाने पुलावरून पाणी वाहत असताना पुलावरून जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
अमरावती : पूर परिस्थितीत पुलांची वाईट स्थिती; प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
सिपना नदीला पूर आल्याने मेळघाटातील अनेक पूल वाहून गेलेत. या पुरात दिया आणि उतावली दरम्यान मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने धारणी तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पूर ओसरल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.
सोमवारी पहाटे सिपना नदीला पूर आल्याने मेळघाटातील अनेक पूल वाहून गेलेत. या पुरात दिया आणि उतावली दरम्यान मुख्य रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने धारणी तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. पूर ओसरल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे बांधकाम करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. हरीसाल येथील पूर पीडितांना बाजार ओट्यांवर राहण्याची व्यवस्था केली तर, दुनी येथील पूरग्रस्तांना जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले आहे.
मेलघाटप्रमाणे सपाट भागत परतवाडा ते अंजनगाव सुर्जी रस्त्यावर सापन नदीवरील वडगाव फत्तेपुर येथील पूल खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. यावर्षी पाऊस जवळपास एक ते दीड महिना उशिराने आला असतानाही प्रशासनाने नद्यांवरील पुलांच्या वाईट अवस्थेची दखल घेतली नाही हे स्पष्ट होते.