अमरावती - भाजप सरकारचा ५ वर्षाचा कालखंड पूर्ण होत आहे. मात्र, या सरकारकडे अपयशी सरकार म्हणून बघितले जात आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. याला फक्त भाजप सरकारची धोरणे जबाबदार आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. महापर्दाफाश यात्रेनिमित्त ते अमरावतीमध्ये बोलत होते.
भाजप सरकारच्या धोरणाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला - बाळासाहेब थोरात
भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णतः खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. अमरावतीमध्ये ते बोलत होते.
भाजप सरकारने शेतकरी, कामगार, व्यापारी, बेरोजगार यापैकी कुणाचेच प्रश्न सोडवले नाही. यांचे नेते जोरजोरात भाषण करतात. मात्र, त्यामध्ये पूर्णतः खोटी माहिती देतात. यांच्या बनवाबनवीच्या कार्यक्रमाची पोलखोल करण्यासाठी महापर्दाफाश यात्रा काढली असल्याचे थोरात म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ येईल, असे ते म्हणाले.
आघाडीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येणार आहे. धर्म निरपेक्ष शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठीच वंचित आघाडीसोबत चर्चा केली जात आहे. मात्र, सोबत यायचे की नाही हा त्यांचा निर्यण आहे, असे थोरात म्हणाले. तसेच देश ज्या वळणावर उभा आहे त्या वळणावर सर्वांनी ताकदीने लढण्याची गरज असल्याचे थोरात म्हणाले.