महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पश्चिम विदर्भात थंडीचा कडाका वाढला; राष्ट्रीय महामार्गावर पसरली धुक्याची चादर...

गेल्या आठवड्यात थंडीच्या प्रमाणात घट झाली होेती. मात्र, आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम विदर्भातील पारा घसरला आहे. तसेच थंडीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

vidhrabha
राष्ट्रीय महामार्गावर पसरली धुक्याची चादर...

By

Published : Jan 4, 2021, 9:21 AM IST

Updated : Jan 4, 2021, 10:32 AM IST

अमरावती- मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. परंतु आज सकाळी शहर व जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. तसचे या गुलाबी थंडी बरोबरच अनेक भागात धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अमरावती-नागपूर महामार्गवर सकाळी आठ वाजताही दाट धुके असल्याने वाहन चालकांना लाईट लावूनच वाहने चालवावी लागली होती. वातावरणातील दृश्यमानता घटल्याने महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.

साधारणता नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ते रविवारपर्यंत थंडीची लाट ओसरली होती. परंतु आज पहाटे पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात पहाटे तापमानात घट झाली असून वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटे आठ वाजताही सगळीकडे अक्षरशः धुक्याची चादर पसरल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळाले. परंतु या धुक्यामूळे वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागली आहे.

राष्ट्रीय महामार्गावर पसरली धुक्याची चादर...
शेकोट्या पेटल्या, उबदार कपडे घालून नागरिकांचा मॉर्निग-वॉक-

कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. शिवाय सकाळी आणि सायंकाळनंतर घराबाहेर पडताना गरम कपडे घालने गरजेचे झाले आहे. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे. दरम्यान, गुलाबी थंडीचा आनंद घेत फिरणाऱ्यांची आणि सायकलिंग करणाऱ्यांची संख्या देखील वाढली.

पश्चिम विदर्भात थंडीचा कडाका वाढला
उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ-

थंडीमध्ये झालेली वाढ बघता उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याने वयोवृद्ध नागरिकांची आणि लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

तूर पिकाला धोका-
सध्या खरीप हंगामातील तूर पीक हे काढणीला आले आहे. परंतु दररोज सकाळी अशाच प्रकारे कडाक्याची थंडी आणि दाटा धुके पडल्यास तूर पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धुक्‍यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 4, 2021, 10:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details