महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती बस स्थानकात एसटी बसची एकाहत्तरी साजरी

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला आज एकाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अमरावती बस स्थानकात बसच्या एकाहत्तरीनिमित्त बस स्थानकावरील प्रवासी, कर्मचारी आणि वीर जवानांच्या कुटुंबियांचा गुलाबपुष्प आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला.

By

Published : Jun 1, 2019, 3:46 PM IST

प्रवाशांना पेढा भरविताना शिक्षक आमदार व राज्यमंत्री श्रीकांत देशपांडे

अमरावती - राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला आज एकाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अमरावती बस स्थानकात बसच्या एकाहत्तरीनिमित्त बस स्थानकावरील प्रवासी, कर्मचारी आणि वीर जवानांच्या कुटुंबियांचा गुलाबपुष्प आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला.

माहिती देताना विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने


अमरावती बस स्थानक परिसरात आयोजित सोहळ्याला शिक्षक आमदार व राज्यमंत्री श्रीकांत देशपांडे, नगरसेवक व भाजपचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय, विभागीय नियंत्रक श्रीकांत गबने आदी उपस्थित होते. यावेळी तुषार भारतीय आणि श्रीकांत गबने यांनी प्रवाशांचा गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला. प्रवाशांनी एसटी बसनेच प्रवास करावा, असे आवाहन यावेळी तुषार भारतीय श्रीकांत गबने यांनी केले.


१ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगरदरम्यान पहिली एसटी बस धावली. त्यानंतर एसटी बससेवेत अनेक टप्प्यात बरेच बदल झालेत. आज 30 विभागीय कार्यालय आणि 250 आगरांमध्ये हा सोहळा साजरा केला जात असल्याची माहिती श्रीकांत गबने यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details